loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेलमध्ये संघटन सृजन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, ब्लॉक स्तरीय पदाधिकारी निवडीसाठी प्रदेश पद्धिकाऱ्यांचा दौरा

पनवेल - महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून ब्लॉक स्तरीय पदाधिकारी निवड प्रक्रिया सुरू झाली असून, त्याअंतर्गत पनवेल शहर जिल्ह्यात आज महत्त्वाचा दौरा संपन्न झाला. या अभियानाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व पनवेल शहर समन्वयक श्रीरंग बरगे यांनी पनवेल शहर जिल्ह्यातील सर्व ब्लॉक व फ्रंटल सेल विभागांतील नवीन अध्यक्षांची निवड करण्यासाठी दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी कॉंग्रेस भवन, पनवेल येथे भेट दिली व त्यानंतर जिल्ह्यामधील संपूर्ण आठ ब्लॉक मध्ये भेट देण्यात आली. या दौऱ्यात विविध विभागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला व १०० हून अधिक नेमणूकीच्या शिफारशी या दौऱ्यादरम्यान प्रदेश काँग्रेसकडे करण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच संघटन बळकटीकरणाच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळणार असून, पक्षाची वाढ अधिक वेगाने होण्यास मदत होईल, असा विश्वासही बरगे यांनी यावेळी व्यक्त केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कामाला प्रभावित होऊन नव्या जोमाने काम करण्याची इच्छा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होईल, असा सकारात्मक प्रतिसाद उपस्थितांमधून मिळाला. पनवेल शहर जिल्ह्यातील या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटन अधिक मजबूत होईल आणि आगामी काळात कॉंग्रेस पक्षाला याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास समन्वयक श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

सदर वेळी पनवेल शहर, जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, नगरसेवक हरीश केणी, नगरसेवक लतीफ शेख, युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे, चंद्रकला नायडू, अखिल अधिकारी, शशिकला सिंग, आरती ठाकूर, चेतन म्हात्रे, अमित दवे, शैलेश पाटणे, प्रीतेश शाहू, सुधीर मोरे, नीता शेनोय, अरुण कुंभार, अशोक पोटे, गोविंद लोंढे, मर्फी म्हसकर, शाहीद मुल्ला, जयवंत देशमुख, अमित लोखंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg