loader
Breaking News
Breaking News
Foto

तळशील किनाऱ्यावरून ऑलिव्ह रिडले कासवांची २४७ पिल्ले सुरक्षित समुद्री अधिवासात

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तळाशील समुद्र किनारी सुमारे २४७ ऑलिव्ह रीडले प्रजातीच्या कासवाच्या पिल्लांना स्थानिक कासव मित्रांनी कांदळवन कक्षाच्या मदतीने सुखरुप समुद्रामध्ये त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. कांदळवन विभाग दक्षिण कोकण व वनपरिक्षेत्र मालवण (कांदळवन) यांच्या मार्गदर्शनाखाली ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या सागरी कासवांच्या संवर्धन व संरक्षणाचे काम तळाशील या किनाऱ्यावर सुरू आहे. या अंड्याची देखभाल व सुरक्षितता ठेवण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी, मालवण (कांदळवन) महादेव शिंगाडे यांचे या संवर्धनामध्ये मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कासव अंडी घातल्यापासून सुमारे ५० दिवसात पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. आज १४ एप्रिल रोजी यातील सुमारे २४७ नवजात पिल्ले त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली. यावेळी कासव मित्र सूर्यकांत कोचरेकर, गौरेश मालंडकर, ललित देऊलकर, दशरथ कोचरेकर, झकास खवणेकर, सर्वेश पेडणेकर, दीपेश मायबा, उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg