loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजात आमदार किरण सामंतांचा प्रभागनिहाय आढावा बैठकांचा सपाटा

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : शहरातील नागरिकांना भेडसावणार्‍या विविध समस्या सोडवून मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आमदार किरण सामंत यांचा लांजा शहरात प्रभागनिहाय आढावा बैठकांचा सपाटा सुरू आहे. या बैठकींमधून नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवत रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यावर आमदार सामंत यांच्याकडून अधिक भर दिला जात आहे. त्या अनुषंगानेच लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक २ मध्ये श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, वरची कुंभारवाडी येथे आमदार सामंत यांच्या उपस्थितीत नुकतीच आढावा बैठक पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बैठकीला प्रभागचे नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आपल्या विविध समस्या मांडल्या. विशेषतः श्रीराम पूल परिसरातील पाणी तुंबण्याच्या समस्येकडे नागरिकांनी बैठकीत लक्ष वेधले. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचल्याने आसपासच्या घरांमध्ये पाणी शिरते, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होतात. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. या समस्येची दखल घेत आमदार किरण सामंत यांनी तात्काळ संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. महामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदार कंपनीला पावसाळ्या अगोदरच नाल्यांची साफसफाई करण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून पाणी साचण्याची समस्या कमी होईल. याशिवाय प्रभाग क्रमांक २ मधील विजेच्या अनियमित पुरवठ्याबाबतही नागरिकांनी तक्रारी मांडल्या. त्यावर उपाययोजना करण्यासाठी संबंधित महावितरण विभागालाही सूचना देण्यात आल्या. तसेच प्रभागातील अंधारमय भागांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांच्या मागणीनुसार स्ट्रीट लाईट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत प्रभागातील इतर विविध समस्या व प्रलंबित विकासकामांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg