loader
Breaking News
Breaking News
Foto

धर्णे प्रतिष्ठान साटेली यांच्यावतीने सर्ई धर्णे हिचा सत्कार

दोडामार्ग (प्रतिनिधी) - धर्णे प्रतिष्ठान साटेली यांच्यावतीने साटेलीतील कु.सई मारुती धर्णे हिने नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) मार्फत घेण्यात आलेल्या पदवीधर फार्मसी एप्टिट्यूड टेस्ट (GPAT) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत देशात 25 वा क्रमांक प्राप्त करून साटेली गावच्या नावलौकीकात भर घातल्याबद्दल तिचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी साटेली देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सदानंद धर्णे,प्रसिद्ध हास्य कलाकार अरूण गवंडळकर, तिचे वडील मारुती धर्णे, उदय धर्णे, महेश धर्णे, महादेव सुतार, प्रवीण धर्णे, राजाराम भाट, श्री. देसाई, शिक्षक सतीश धर्णे, सुधाकर धर्णे, प्रतीक राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी महादेव सुतार यांनी धर्णे प्रतिष्ठान साठेलीतील यश प्राप्त केलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या पाठीवर सतत कौतूकाची थाप मारत असते. साटेली गावत शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रयत्नशील असते असे सांगितले. यावेळी शिक्षक सतीश धर्णे यांनी मनोगतात कु. सई हिने मिळवलेले यश हे निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. साटेलीतील इतर मुलांनीही तिचा आदर्श घ्यावा असे मत मांडले. उपस्थितानी धर्णे प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg