loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

आबलोली(संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यू. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकिय कार्याचा संक्षेपात आढावा घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा सर्वांनी आदर्श घेवून आपल्या आयुष्यात त्यांच्या विचारांची जोपासना करुन आजच्या काळात त्यांचे विचार तेवत ठेवून कार्य करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच उपस्थित प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. दिनेश पारखे, डॉ. सुभाष खोत, प्रा. सुभाष घडशी, प्रा. लंकेश गजभिये, प्रा. कांचन कदम, महाविद्यालयाचे वरीष्ठ लिपिक सुधीर टानकर, संदिप चव्हाण, ग्रंथालय परिचर परशुराम चव्हाण, नंदकुमार भेकरे व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव केले तर उपस्थित मान्यवर यांचे आभार प्रा. कांचन कदम यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg