loader
Breaking News
Breaking News
Foto

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या ५० वर्षीय महिलेचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याच्या रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या

ठाणे (प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या शहाड ते ठाणे प्रवासा दरम्यान डब्यातून प्रवास करत असताना रेल्वेमध्ये चोरी करुन उत्तरप्रदेशात पसार होणाऱ्या फुरकान उर्फ मुल्ला सुखे अन्सारी (४५) या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळ्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपीची चौकशी केली असता, त्याने अयुच अन्सारी, शरीफ अन्सारी आणि खुश्मीद अन्सारी या तिघांच्या मदतीने चोरी केल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेले दागिने जप्त केले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१२ मार्चला दुपारी १.४७ वाजताच्या सुमारास कल्याण येथील वरप गाव भागात राहणाऱ्या ५० वर्षीय महिला पनवेल येथे जायला निघाली. त्यांनी शहाड रेल्वे स्थानकातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्रवास सुरु केला. तेथून तिने ट्रान्स हार्बर मार्गाने पनवेल स्थानक गाठले. पनवेल येथील एसटी थांब्यावरून पनवेल ते बडखळ असा प्रवास केला. तिने बॅगेमधील एका स्टिलच्या डब्यामध्ये सोन्याचे दागिने ठेवले होते. घरी पोहचल्यानंतर तिला दागिने ठेवलेला डबा आढळून आला नाही. याप्रकरणी तिने बडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे युनीट-दोन कडून सुरु होता. पोलिसांनी सर्व रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. परंतु चोरटा आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी पनवेल बस थांब्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यावेळी सराईत गुन्हेगार फुरकान हा पोलिसांना सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आला. हे चित्रीकरण पोलिसांनी तक्रारदार महिलेला दाखविल्यानंतर त्यांनी तो शहाड ते ठाणे प्रवासादरम्यान त्यांच्याच डब्यातून प्रवास करत होता. अशी माहिती तिने दिली. त्यामुळे ही चोरी फुरकान याने केल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले.

टाईम्स स्पेशल

दरम्यान फुरकान हा उत्तरप्रदेशातील बिजनौर येथील त्याच्या गावी निघून गेल्याची माहिती खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक बिजनौर येथे गेले असता, फुरकान हा येथील एका भागात गुरांसाठी खाद्य पदार्थ नेण्यास येतो अशी माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथकाने सापळा रचला. परंतु तो त्यादिवशी तेथे गेला नाही. ४ एप्रिलला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कोतवाली, देहात पोलिसांनी अटक केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg