ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महानगर पालिका हद्दीत मुंब्र्याच्या देवळीपाडा परिसरात तांबेवाडी चाळीत एका खोलीचे प्लास्टर पडल्यामुळे छताला लावलेला फॅन खाली पडून दोन जण जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये जखमी असलेल्या चिमूरडीला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली असून जखमींना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
रविवारी पहाटे मुंब्रा, देवरीपाडा येथील टोल नाक्याजवळ असलेल्या तांबेवाडी चाळ या तळ अधिक १ मजली इमारतीमधील तळमजल्यावरील एका खोलीचे प्लास्टर अचानक कोसळल्याने सिलिंग फॅनही खाली पडला. यावेळी खोलीत झोपलेले दोन जणांना दुखापत झाली. या घटनेत आसिफ खान (३२) यांच्या डोक्याला मार लागला असून तीन वर्षांच्या आस्मा खान हिला पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. दोघांनाही तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर उपचार सूरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
















































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)
























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.