loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

वरवेली (गणेश किर्वे) - सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी कार्यरत असणारी रत्नागिरी जिल्ह्यातील शासनमान्य संस्था म्हणून गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था ही गेली २४ वर्ष सतत दिव्यांगांसाठी कार्यरत आहे. या संस्थेचा २४ वा वर्धापन दिन बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक ११ वाजता संस्थेचे कार्यालय वरवेली चिरेखाण फाटा ता. गुहागर जिल्हा रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून दिव्यांगांसाठी तसेच विधवा, विधुर व घटस्फोटीत व्यक्तींसाठी राज्यस्तरीय वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. याच कार्यक्रमांमध्ये दिव्यांगांना व दिव्यांग संस्थेला सर्वतोपरी मदत करणाऱ्या व्यक्तींना दिव्यांग साथी व दिव्यांग मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावर्षी या पुरस्काराचे मानकरी सत्यवान प्रभाकर घाडे यांना दिव्यांग साथी तर विनायक तुकाराम जाधव - (सहाय्यक शिक्षक श्री देव गोपाळ कृष्ण विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर) यांना दिव्यांग मित्र पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांगत्वावर मात करून स्वतःचा व कुटुंबाचा आर्थिक विकास करून दिव्यांगांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या अनंत दत्ताराम पालकर गाव पालपेणे ता. गुहागर यांना स्वयंसिद्ध पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याच कार्यक्रमांमध्ये नासा व इस्त्रो मध्ये निवड झालेल्या गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील पाच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच गरजू दिव्यांगांना संस्थेच्या वतीने कृत्रिम साहित्याचे वाटपही करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे संस्थेच्या निधी संकलन उपक्रमात विशेष उल्लेखनीय निधी संकलन केलेल्या प्रथम तीन विद्यार्थी शाळा व केंद्र यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

दुसऱ्या सत्रात दरवर्षीप्रमाणे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे तसेच सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी फनी गेम व विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलेले आहे. तरी दिव्यांगांनी दिव्यांगांसाठी चालविलेल्या या सेवाभावी संस्थेच्या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारच्या दिव्यांगांनी तसेच संस्थेचे सल्लागार, हितचिंतक व समाजातील व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून दिव्यांगांना प्रोत्साहित करावे. तसेच आपल्या ओळखीतल्या किंवा घराजवळपास राहत असलेल्या दिव्यांगांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी केलेले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg