loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश; समुद्रकिनाऱ्यांसाठी ५ कोटींचा निधी

रत्नागिरी - जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, भाट्ये, गणपतीपुळे, गणेशगुळे, गावखडी, वेळणेश्वर, मुरुड आणि लाडघर या प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर मूलभूत सुविधा उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सुपूर्द करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निधीतून संबंधित किनाऱ्यांवर १३ इको टॉयलेट (बायो डायजेस्टरसह) आणि १३ चेंजिंग रूम्स उभारण्यात येणार आहेत. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता स्वच्छता व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

टाईम्स स्पेशल

या प्रकल्पासाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने कोकणातील पर्यटन क्षेत्राला नवी गती मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. या सुविधांमुळे पर्यटकांना अधिक चांगला अनुभव मिळणार असून, स्थानिक व्यवसाय व रोजगारालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg