loader
Breaking News
Breaking News
Foto

महावितरण संगमेश्वर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - दि १४ एप्रिल रोजी संगमेश्वर- महावितरण च्या संगमेश्वर कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी व महात्मा जोतीबा फुले यांची 199 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना सहाय्यक अभियंता फारुक गवंडी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या सामाजिक कामाबद्दल विस्तृत माहिती दिली. महात्मा फुलेंच्या स्वप्नातील समतावादी भारत निर्माण करण्यासाठी त्यांना गुरू मानून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष केला. महात्मा फुले यांनी शिक्षण हे सार्वत्रिक, सक्तीचे व मोफत असले पाहिजे ही हंटर समिती समोर सर्वात पहिल्यांदा मागणी केली. त्याची अंमलबजावणी कोल्हापूर संस्थानात सर्वप्रथम छत्रपती शाहू राजांनी केली. आणि संपूर्ण भारतात संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याबाबतचा कायदा केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतातील विजेच्या प्रश्नाबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही अतिशय लक्षणीय आणि क्रांतिकारक होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर १९४२ ते १९४६ या काळात ऊर्जामंत्री असताना त्यांनी वीज मंडळांना सरकारी अनुदान, छोट्या ग्राहकांना सबसिडी, नॅशनल पावर ग्रिड, CEA सेंट्रल इलेक्ट्रिसिटी व वीज ही संविधानाच्या समवर्ती सूचित ठेवणे इत्यादींच्या माध्यमातून गरीब, शोषित, वंचित त्यांच्या घराघरांमध्ये प्रकाश पोचवणारी वीज मंडळे सक्षम करण्यासाठी योगदान दिले. ज्ञान तर्क आणि स्वाभिमान या त्रिसूत्री वर फुले आंबेडकर यांचे कार्य होते. स्त्रिया, वंचित, शोषित शूद्र अतिशूद्र अश्या तळागाळातील घटकांसाठी मानवतेच्या अत्युच्च मूल्यासाठी त्यांचा संघर्ष होता. व ही मूल्ये भारतीय संविधानात समाविष्ट झालेले आहेत म्हणून आंबेडकरांना अभिवादन करणे म्हणजे संविधानाला अभिप्रेत असणारे आचरण करणे हे होय. असेही ते म्हणाले.

टाईम्स स्पेशल

यावेळी सर्व वक्त्यांनी अभिवादन करताना शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा पुढील काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश सर्व क्षेत्रांमध्ये महत्त्वाचा ठरणार आहे, अशी भावना व्यक्त केली. या संयुक्त जयंतीसाठी अभिवादन करण्यासाठी व आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कनिष्ठ अभियंता योगीनाथ गोरे, विनिल काष्टे, रमेश कदम, ओमकार कळंबटे, विश्वनाथ जोशी, विजय भरणकर, साईश मस्के इ इत्यादी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg