पनवेल - पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या नवनाथ नगर झोपडपट्टीतील काही झोपडी धारकांना त्यांच्या झोपड्यांसाठी नगरपरिषद असतानाच्या कालखंडामध्ये कर पावती दिली जात होती. मात्र महापालिका अस्तित्वात आल्यानंतर त्या झोपडीधारकांना अवैध ठरवून त्यांची कर पावती रद्द करण्यात आली. वास्तविक गेले अनेक वर्षे तिथे राहत असलेल्या या झोपडीधारकांना अवैध ठरवल्यामुळे पालिकेकडून त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार ठेवण्यात आली आहे.
अशा परिस्थितीमध्ये आपण उघड्यावर येऊ ही भीती या नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेतर्फे त्यांच्या झोपड्यांना पुन्हा एकदा कर पावती सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी सदर नवनाथ नगर झोपडी धारकांनी पनवेल महानगरपालिकेच्या प्रांगणात उपोषणाला सुरुवात केली आहे. बुधवारी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन, त्यांचा प्रश्न व त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी अरविंद म्हात्रे यांनी सदर झोपडीधारकांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी उपोषणकर्त्यांनी अरविंद म्हात्रे यांचे आभार मानताना, अरविंद म्हात्रे यांच्यासारखा अभ्यासू विरोधी पक्षनेता आमच्या समस्या जाणून घेऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्यासह नगरसेवक हरेश केणी, गटनेते केतन म्हात्रे, नगरसेवक प्रकाश म्हात्रे, राम पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.














































2.jpg)





























.jpg)























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.