loader
Breaking News
Breaking News
Foto

एसटी महामंडळाच्या तिकिट दरात १० टक्के हंगामी भाडेवाढ

रत्नागिरी : उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता एसटी महामंडळाने कात्री लावली आहे. दि.१५ एप्रिल २०२६ पासून एसटीने १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, या वाढीव दराची अंमलबजावणी सुरू होत आहे. यामुळे ऐन सुट्ट्यांच्या हंगामात पर्यटनासाठी किंवा मामाच्या गावाला जाणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिक सहलींचे आयोजन करतात. उन्हाळ्याच्या दिवसात एसटी बसला होणारी गर्दी लक्षात घेऊन उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे. तसेच आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेल पुरवठ्यावर झालेला परिणाम आणि वाढते खर्च यामुळे ही दरवाढ अटळ असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ही तात्पुरती भाडेवाढ १५ जून २०२६ पर्यंत लागू राहणार असून, त्यानंतर दर पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या दरवाढीमुळे रत्नागिरी विभागातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे दर लक्षणीयरीत्या वाढले आहेत. रत्नागिरी ते मुंबई प्रवासासाठी प्रवाशांना आता ६२ रुपये अधिक द्यावे लागतील, तर बोरिवलीसाठी ६५ रुपये आणि पुणे प्रवासासाठी ५७ रुपये जादा मोजावे लागतील. लांजा येथून अक्कलकोटसाठी ५० रुपये आणि धाराशिवसाठी ५५ ते ६० रुपयांनी तिकीट महागले आहे. त्याचप्रमाणे गुहागर-मुंबई, दापोली-पुणे आणि संगमेश्वर-मुंबई या मार्गांवरही ३६ ते ६५ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे निमआराम, शयनयान आणि शिवशाही बसच्या दरांमध्ये केवळ दोन रुपयांची नाममात्र वाढ करण्यात आली आहे. केवळ भाडेवाढच नाही, तर आता स्वच्छतेचा भारही प्रवाशांच्या पदरी पडणार आहे.

टाईम्स स्पेशल

एसटी बस आणि बसस्थानकांच्या स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी महामंडळाने 'स्वच्छता अधिभार' लागू केला आहे. १५ एप्रिलपासून प्रत्येक तिकीटधारी प्रवाशाकडून दोन रुपये अतिरिक्त वसूल केले जाणार आहेत. यामुळे प्रत्येक प्रवासागणिक प्रवाशांना मूळ भाड्यापेक्षा जास्त रक्कम खर्च करावी लागणार आहे. महामंडळाच्या या निर्णयावर विविध राजकीय पक्षांनी आणि प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून, सर्वसामान्यांच्या प्रवासावर गदा येत असल्याची टीका होत आहे. एकीकडे खाजगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडलेले असताना, आता सरकारी बसचा प्रवासही महागल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg