loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्या कळंबस्ते-वाडावेसराड येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान टप्पा-१” अंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता फणसवणे महसूल मंडळासाठी डॉ. र. दि. गार्डी माध्यमिक विद्यालय, कळंबस्ते-वाडावेसराड येथे होणार आहे. या शिबिरात नागरिकांना विविध महसूल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून तक्रार निवारणावरही विशेष भर दिला जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिबिराची वैशिष्ट्ये- या शिबिरात “एक खिडकी योजना” राबवण्यात येणार असून तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी हे सर्व अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण करतील. उपलब्ध सेवा- डिजिटल ७/१२ व ८अ उतारे क्यूआर कोडसह तात्काळ उपलब्ध. उत्पन्न, जात, रहिवासी (अधिवास) व नॉन-क्रीमी लेअर प्रमाणपत्रे – अर्ज स्वीकृती व वितरण. प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा. अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क – ७/१२ मधील चुका दुरुस्ती व तांत्रिक समस्या निवारण. अकृषक (NA) रूपांतरणाबाबत मार्गदर्शन – नवीन सुधारित नियमांची माहिती तसेच डिजिटल स्वाक्षरी असलेल्या ७/१२ उताऱ्याची कायदेशीर वैधता याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

टाइम्स स्पेशल

या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना पारदर्शक, तत्पर आणि सौजन्यपूर्ण सेवा देण्याचा प्रशासनाचा मानस असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg