ठाणे (प्रतिनिधी) : नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला देण्याच्या बदल्यात २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वन विभागातील दोन लोकसेवकांना लाच घेताना बुधवारी रंगेहात पकडले. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड रोड, मामनोली (ता. कल्याण) येथील वनपरिमंडळ अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. तक्रारदाराला नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी वन विभागाचा ना हरकत दाखला हवा होता. या कामाचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी संशयित वनपाल विलास शिवाजी सानप (वय ५१ ) यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीनंतर ही रक्कम २५ हजार रुपये ठरवण्यात आली. तक्रारदाराने याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या मागणीची पथकाने पडताळणी केली, त्यात लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, १५ एप्रिल २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. त्यावेळी संशयित विलास सानप यांच्या सांगण्यावरून वनरक्षक रेखा विनायक गायकवाड (वय ३८) यांनी २५ हजार रुपये स्वीकारताच त्यांना पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली आहे.





























.jpg)


















































































































































































































1.jpg)





































.jpg)

































































































































































































































1.jpg)












3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.