loader
Breaking News
Breaking News
Foto

भोसले इन्स्टिट्यूटच्या ६ विद्यार्थ्यांची बॉयन्सीमध्ये निवड; कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मिळाले यश

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ६ विद्यार्थ्यांची बॉयन्सी कन्सल्टंट्स अँड इंजिनिअरिंग या जहाज डिझाईन क्षेत्रातील कंपनीत यशस्वी निवड झाली आहे. कॉलेजमध्ये आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यू दरम्यान ही निवड करण्यात आली. बॉयन्सी कन्सल्टंट्स ही मरीन इंजिनिअरिंग व शिप डिझाईन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून जहाजांचे डिझाईन, ऑफशोअर प्रोजेक्ट्स, थ्री-डी मॉडेलिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट तसेच जहाजांच्या दुरुस्ती व रूपांतरणाशी संबंधित सेवा पुरवते. भारतासोबतच कंपनीची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर असून अमेरिका, नॉर्वे, सिंगापूर आदी देशांतील प्रकल्पांसाठी कंपनी सेवा पुरवते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कॅम्पस ड्राइव्हमध्ये कंपनी प्रेझेंटेशन, लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन, टेक्निकल इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्ह्यू अशा विविध टप्प्यांद्वारे निवड प्रक्रिया पार पडली. यात मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पैकी ६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. मुलाखतींचे यशस्वी नियोजन कॉलेजचे टीपीओ हेड मिलिंद देसाई, टीपीओ महेश पाटील व इलेक्ट्रीकल अधिव्याख्याता समित निर्मळकर यांनी केले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg