loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुका कृषी विभागाची खरीप हंगाम पूर्व नियोजन सभा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न

राजपूर (प्रतिनिधी) - राजापूर तालुका कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पूर्व नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेल आमदार किरण सामंत यांनी अध्यक्षस्थानी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. सभेत येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये बियाणे व खतांचा पुरवठा, पिकांचे नियोजन, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, तसेच शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. आमदार किरण सामंत यांनी शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाचा विचार करून पिकांची निवड करावी, तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले. त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा व मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी कृषी अधिकारी, कर्मचारी तसेच तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असा निष्कर्ष या सभेत काढण्यात आला. यावेळी लांजा राजापुरचे आमदार किरण सामंत, राजापूर सभापती नंदनी कदम, लांजा सभापती मानसी आंबेकर, राजापूर उपसभापती अभिजीत गुरव, दीपक नागले, गटविकास अधिकारी राजापूर संतोष मेहरे, लांजा गटविकास अधिकारी गिरी, जिल्हा परिषद सदस्य रमेश सूद, प्रकाश कुवळेकर, सोनाली ठुकरूळ, नायब तहसीलदार लांजा सुरेंद्र भोजे, राजापूर नायब तहसीलदार सरफरे, पंचायत समिती सदस्य पंढरी मयेकर, प्रसाद मोहरकर, यशवंत वाकडे, दादा पत्की, भाग्यश्री लाड, जानवी गावकर, सिद्धाली मोरे स्पृहा गुरव, उमेश पराडकर, लांजा राजापूर तालुका कृषी अधिकारी, सर्व सरपंच, कृषी विभागावचे सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg