loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर व सहा वर्षीय दिव्यांका नार्वेकरची नेत्रदीपक कामगिरी

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सांगली येथील सुरज स्पोर्ट्स ॲकेडमी आणि नुतन बुद्धिबळ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने "बावीसाव्या सुरज फिडे रॅपिड रेटिंग राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे" आयोजन करण्यात आले. स्पर्धेत भारतातील महाराष्ट्रासहीत सहा राज्यातील दोनशे ऐशी खेळाडूंनी सहभाग घेतला. मुक्ताई ॲकेडमीच्या बाळकृष्ण पेडणेकर, राजेश विरनोडकर, दिव्यांका नार्वेकर, प्रज्वल नार्वेकर या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई ॲकेडमीचे विद्यार्थी गेली दहा वर्षे सातत्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिके मिळवत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचा खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने नऊ राऊंड्सपैकी सात राऊंड्स जिंकून रेटिंग कॅटेगरीत दुस-या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. मान्यवरांच्या हस्ते बाळकृष्णला रोख रक्कम, आकर्षक चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. मुक्ताई ॲकेडमीची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात लहान, सिनीअर केजीमध्ये शिकणारी सहा वर्षीय दिव्यांका विनायक नार्वेकर हीने या स्पर्धेत "बेस्ट परफॉर्मर यंगेस्ट गर्ल" चे पारितोषिक पटकावले. दिव्यांकाने केवळ तीन महिन्यात मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि बुद्धिबळ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांच्याकडे प्रशिक्षण घेऊन हे यश मिळवले. तीने नऊ राऊंड्समध्ये तीन राऊंड्स जिंकले. मान्यवरांच्या हस्ते तीला आकर्षक चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

कौस्तुभ पेडणेकर यांनी छोट्या दिव्यांकाचे कौतुक करतानाच जिल्ह्यातील मुलांमध्ये अफाट बुद्धिमत्ता असल्याचे सांगितले. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण येथील विद्यार्थी मुक्ताई ॲकेडमीत प्रशिक्षण घेऊन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतात आणि पारितोषिक मिळवतात याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. दिव्यांकाच्या पालकांप्रमाणे इतर पालकांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी पाऊल उचलणं आवश्यक आहे असे ते म्हणाले. कोल्हापूरचे रहिवासी असलेले दिव्यांकाचे वडिल बँक अधिकारी विनायक नार्वेकर आणि आई दिपाली नार्वेकर यांनी दिव्यांकाने पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या यशाचा आनंद व्यक्त करताना कौस्तुभ पेडणेकर यांनी जिल्ह्यात मुलांना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला, हे कौतुकास्पद असल्याचं म्हटले. सर्व स्तरातून बाळकृष्ण आणि दिव्यांकाचे कौतुक करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg