सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील पाणी, लाईट, परिसर सफाईसह अन्य नगरपरिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या समस्या तात्काळ दुर केल्या जातील, अशी माहिती सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रध्दा सावंत भोसले यांनी दिली. तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय मोठा असून त्यावर पालकमंत्री नितेश राणेंशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. आज नगराध्यक्षांच्या उपजिल्हा रुग्णालयाची पहाणी करत समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नगराध्यक्षा श्रध्दा सावंत भोसले यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत समस्या जाणून घेतल्या. वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐळवे यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी मदत होणाऱ्या बाबींकडे लक्ष वेधले. यावेळी नगराध्यक्षा भोसले म्हणाल्या, रुग्णालयातील पाणी, पोस्टर मार्टम रूमकडील लाईट, परिसरातील स्वच्छतेसह विविध समस्यांबाबत आढावा घेतला. बुधवारी यावर बैठक घेऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. झाडी कटिंग, लाईटसह आमच्या अखत्यारीतल विषय तात्काळ मार्गी लागतील. पाणी पुरवठा संदर्भातील बील रूग्णालयाला मिळालेले नाही. त्यासंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, तर सार्वजनिक बांधकाम व इतर विभागांच्या अखत्यारीतील विषय देखील लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐळवे, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणी पुरवठा सभापती प्रतिक बांदेकर, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रवी जाधव, उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचे सदस्य राजू केळुसकर, संजय लाड, एन.बी. रेडकर, जितेंद्र मोरजकर, संपत दळवी तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.























































































































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.