loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडी-कारीवडे मार्गावर भीषण अपघात

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - ​कारीवडे येथील गोठण देवस्थानजवळ झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात संतोष गुळदवेकर (२३) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. नाटक कंपनीत झांज वाजंत्रीचे काम करणारा संतोष हा आपले काम आटोपून घरी परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. संतोष गुळदवेकर हे रात्री नाटक संपवून आपल्या मोटरसायकलने माडखोल येथील घरी जात होते. दरम्यान, कारीवडे येथील गोठण देवस्थानजवळ समोरून येणाऱ्या एका वाहनाला त्यांनी जोरदार धडक दिली. या अपघातात संतोष यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचे हात फॅक्चर झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी निलेश राऊळ, त्यांचे सहकारी शरद पवार आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोस्कर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गंभीर जखमी संतोष यांना तत्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याचवेळी, 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'चे रवी जाधव यांना या घटनेची कल्पना देण्यात आली. ​रवी जाधव यांनी रुग्णालयात पोहोचून संतोष यांच्यावर प्राथमिक उपचार करून घेतले आणि तातडीने पुढील उपचारासाठी त्यांना गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली.

टाईम्स स्पेशल

रवी जाधव यांनी संतोष यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता, त्यांची प्रकृती आता सुधारत असून ती स्थिर असल्याचे समजले आहे. या कठीण प्रसंगात रवी जाधव, अमोल आरोस्कर आणि निलेश राऊळ यांच्या मदतीमुळे संतोष यांना वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg