loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग विजघर मार्गावर मोऱ्यांचे बांधकामे संशयाच्या भोवऱ्यात

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील अनेक वर्षे सुस्थित असलेल्या मोऱ्या रस्ता नवीन करताना उखडून टाकून सिमेंट पाईप घातले जात आहेत. खाली सोलिंग दगड पिचिंग न करता पाईप घातले जात आहेत. ही नवीन पद्धत पुण्याची ठेकेदार यांनी सुरू करून दोडामार्ग तालुक्यातील जनतेच्या डोळयात धूळफेक केली जात असल्याची चर्चा नागरिकांकडून केली जात आहे. यामुळे महामार्गावरील मोऱ्यांचे बांधकाम संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग ते विजघर रस्ता रूंदीकरण काम केले जात आहे, यासाठी जुन्या मोऱ्या उखडून टाकल्या जात आहेत. या ठिकाणी जास्त वजनाचे मोठे सिमेंट पाईप घातले जात आहेत. हे वजनदार पाईप जमीनखाली खचू नये यासाठी खाली दगड पिचिंग सोलिंग सिमेंट काँक्रीटचा थर देणे आवश्यक आहे. पुण्यात अशा प्रकारे आम्ही काम करतो असे सांगून जनतेला उल्लू बनवून मोऱ्या पाईप चक्क मातीवर बसवले जात आहे.

टाईम्स स्पेशल

दोडामार्ग ते तिलारी मार्गावर दोडामार्ग केळीचेटेंब, आंबेली, चार ठिकाणी झरेबांबर दोन ठिकाणी साटेली भेडशी, कुडासा तिठा, आवाडा, इतर ठिकाणी मोऱ्या बांधकाम करताना जुन्या मोऱ्या बांधकाम तोडून चक्क नवीन पाईप घालताना संबधित ठेकेदार यांनी जावर्ई शोध लावून मोऱ्या बांधकाम सुरू केले आहे. या मोऱ्या पावसाळ्यात अपघातास कारणीभूत ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg