loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय सिंधूरत्न भूषण कबड्डी चषक अनिकेत स्पोर्ट क्लब भरणे संघाने पटकावला

खेड (दिलीप देवळेकर) - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या सहकार्याने वेंगुर्ला या ठिकाणी दिनांक १३ एप्रिल 2026 रोजी सिंधूरत्नभूषण चषक कबड्डी स्पर्धा जय मानसेश्वर कबड्डी संघ वेंगुर्ला आयोजित भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये एकूण नामांकित सोळा संघाने सहभाग घेतला. या स्पर्धेत अनिकेत स्पोर्ट क्लब भरणे संघ सहभागी झाला होता. उपांत्य फेरीमध्ये स्वराज्य स्पोर्ट क्लब चिपळूण या बलाढ्य संघावर मात करून अंतिम फेरीमध्ये अनिकेत स्पोर्ट क्लब दाखल झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अंतिम सामना एस.एम.स्पोर्ट्स क्लब कुडाळ या संघामध्ये अटीतटीची लढत झाली व अंतिम 30 विरुद्ध 25 या गुण फरकाने हा सामना अनिकेत स्पोर्ट क्लबने पटकावला. उत्कृष्ट पकडी मान समरीन बुरोंडकर हिला गौरवण्यात आले. तसेच स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्धी चाळके हिचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सदर संघामध्ये राष्ट्रीय खेळाडू तस्मिन बुरोंडकर, सायली शिंदे, सलोनी महाडिक, वंशिका कांचावडे, वैशाली जाधव, समीक्षा शिंदे, जानवी शिंदे, श्रावणी जाधव, मनीषा राठोड या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला. या सर्व खेळाडूवर पंचक्रोशीतून सर्व खेळाडू अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

टाईम्स स्पेशल

खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष नूतन खेड नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे कार्याध्यक्ष महेश भोसले यांनी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तेजा बैकर, सुभाष आंबेडे, दाजी राजगुरू, विलास बेंद्रे, सुजित फागे यांचे सदर संघाला मार्गदर्शन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg