loader
Breaking News
Breaking News
Foto

​महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांची आज समाजाला गरज : प्रा. रुपेश पाटील

सावंतवाडी (प्रतिनिधी) -'अलीकडे आपण महामानवांना फक्त डोक्यावर घेऊन नाचत आहोत, पण खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांना डोक्यात घालून त्यांचे चरित्र वाचण्याची आणि आचरणात आणण्याची आज गरज आहे,' असे प्रतिपादन वक्ते प्रा. रुपेश पाटील यांनी माजगाव येथे केले. ​महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि डॉ. आंबेडकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील स्वर्गीय भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. पाटील बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचा ​उद्देश: विद्यार्थ्यांमधील कला, विचारशक्ती, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करणे.चित्रकला, निबंध लेखन, वक्तृत्व, वेशभूषा (फॅन्सी ड्रेस) आणि पोस्टर मेकिंग या पाच प्रकारच्या स्पर्धांचे दोन गटांत (५ वी ते ८ वी आणि ९ वी ते ११ वी) आयोजन करण्यात आले होते.​ सावंतवाडी तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने व उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी प्रा. डॉ. देविदास बोर्डे यांनी शिक्षण आणि समानता, तर माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध महात्मा फुले यांनी दिलेल्या लढ्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे गेल्या १४ वर्षांपासूनचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगत प्रा. पाटील यांनी संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या कार्याचे कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रथमेश सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समीर शिर्के यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गौरी आडेलकर, रूचा पेडणेकर, हर्षदा कोरगावकर, वैष्णवी म्हाडगुत, तन्वी केसरकर व शुभम लोणाग्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व प्रेरणादायी विचारांचा जागर झाल्याचे दिसून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg