loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तहसिल कार्यालयासमोरील भुयारी मार्गासंदर्भात आंदोलन छेडण्याचा महाविकास आघाडीचा इशारा

लांजा (वार्ताहर) - लांजा तहसील कार्यालयासमोरील भुयारी मार्ग (अंडरपास) ठेवण्याबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असेल तर जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडीच्यावतीने कोणत्याही क्षणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा लांजा महाविकास आघाडीच्यावतीने देण्यात आला आहे. लांजा तहसील कार्यालयासमोर अंडरपास ब्रिजची मागणी होत असताना लोकांच्या या मागणीच्या लढ्यात आता लांजा तालुका महाविकास आघाडीने उडी घेतली आहे. गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई - गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. यामुळे लांजावासीयांना आजवर असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले होते. गत पावसाळ्यात तर चिखलातून वाट काढताना लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा तहसील कार्यालय परिसरादरम्यान सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय तसेच रुग्णालय असल्याने याठिकाणी विद्यार्थी आणि लांजा शहरासह तालुक्यातील नागरिकांची कायम रहदारी असते. याठिकाणी होत असलेल्या भरावाच्या भिंतीच्या ठिकाणी लांजा तहसील कार्यालयासमोर अंडरपास ब्रिज उभारावा अशी मागणी सातत्याने लांजावासीयांकडून केली जात आहे. मात्र तरी देखील महामार्ग ठेकेदार कंपनीकडून या ठिकाणी भारावाच्या भिंत उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी अंडरपास ब्रिज होण्याची आशा ही जवळपास मावळली आहे. जनतेच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आता शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसचे - काँग्रेस महाविकास आघाडीच्यावतीने आवाज उठविला जात आहे. यापूर्वी वेळोवेळी या प्रश्नासंदर्भात प्रशासन, शासनाकडे लेखी स्वरुपात पाठपुरावा करण्यात आलेला होता. मात्र प्रशासनाकडून त्यांच्या वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार किंवा पाठपुरावा केला जात नसल्याचे महाविकास आघाडीचे म्हणणे आहे.

टाईम्स स्पेशल

लांजावासीयांच्या या महत्त्वाच्या आणि ज्वलंत प्रश्नावर जर प्रशासन डोळेझाक करून जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असेल तर तमाम लांजावासीयांच्या हितासाठी, त्यांच्या रास्त मागणीसाठी महाविकास आघाडी कोणत्याही क्षणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छडेल असा इशारा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या आंदोलनादरम्यान काही परिस्थिती उद्भवली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील असा इशारा देखील महाविकास आघाडीच्यावतीने दाजी गडहिरे, अभिजीत राजेशिर्के, मोहन तोडकरी, सचिन लिंगायत यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg