loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाच्यावतीने आयोजित महारक्तदान शिबिराला शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : शिवसेना रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाच्यावतीने बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला शिवसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल 257 रक्त पिशव्या गोळा करण्यात आले. मागील काही महिन्यांपासून रक्त पिशव्यांचा तुटवडा जिल्हा रुग्णालयाला जाणवत होता. मात्र या महारक्तदान शिबिराने रुग्णालयाला जाणवणारा प्रश्न सोडवण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, लांजा-राजापूरचे आमदार भैय्या सामंत यांच्या प्रेरणेमधून या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी मतदार संघातील शिवसैनिक, महिला आघाडी, युवा पदाधिकारी सर्वजण हे शिबीर यशस्वी करण्यासाठी धडपडत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहरातील जयेश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला सकाळी 9 वाजल्यापासून सुरुवात झाली होती. महारक्तदान शिबिराची तयारी गेल्या काही दिवसांपासून मतदार संघात सुरु होती. याबाबत पालकमंत्र्यांनी स्वत: आढावा घेऊन सूचनाही केल्या होत्या. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय पथक डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान करण्यासाठी आलेल्या रक्तदात्यांची तपासणी करीत होते. स्व:त पालकमंत्री ना. सामंत यांनी शिबीरस्थळी भेट देत, पाहणी केली आणि रक्तदान करणाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शिबिरासाठी झटणाऱ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसह वैद्यकीय पथकातील अधिकारी, डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत जि.प. उपाध्यक्ष विलास चाळके, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, पंचायत समिती सभापती प्रविण पांचाळ, जि.प. सभापती नंदा मुरकर, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, युवा तालुकाप्रमुख तुषार साळवी यांच्यासह नगरसेवक, जि.प. व पं.स. सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. रक्तपेढीची साठवण क्षमता संपल्याने सायंकाळी पाच वाजता रक्तदान शिबीर थांबवण्यात आले. अनेक रक्तदात्यांची नावे व रक्तगटाची चाचणी करुन नोंद करुन ठेवण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयाला पुन्हा आवश्यकता असेल तेव्हा अशाचप्रकारे रक्तदान शिबीर आयोजित केले जाणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg