loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये आशा भोसले यांना स्वरप्रेरणा प्रतिष्ठानतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

खेड (प्रतिनिधी) : स्वरप्रेरणा संगीत व कला प्रतिष्ठान यांच्या वतीने ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना खेड शहरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील तीनबत्ती नाका परिसरातील हुतात्मा अनंत कान्हेरे चौकात हा श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी आशा भोसले यांच्या अमर गाण्यांची आठवण काढत उपस्थितांनी त्यांच्या संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरव केला. त्यांच्या स्वरांनी भारतीय संगीतसृष्टीला दिलेली समृद्धी आणि अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी त्यांची कारकीर्द याबाबत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाला डॉ. उपेंद्र तलाठी, उत्तमकुमार जैन, एस. डी. शिर्के, अनिकेत कानडे यांच्यासह शहरातील नागरिक व संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वातावरणात भारावलेपण जाणवत होते आणि आशा भोसले यांच्या आठवणींनी उपस्थितांचे डोळे पाणावले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून खेड शहरातील संगीतप्रेमींनी आपल्या लाडक्या गायिकेला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg