संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - चिन्मय संतोष जाधव मु. पो. कोसुंब, सहाणेची वाडी, संगमेश्वर, राहणार मुंबई यांची २०२६ वर्षी आयपीएलमध्ये लखनऊ या संघाकरिता प्रमुख सिनेमॅटोग्राफर म्हणून निवड झाली आहे. शिक्षणाची फार आवड नसणार्या चिन्मयमध्ये लहानपणापासूनच चित्रकला, शिल्पकला आणि फोटोग्राफीचे आकर्षण होते. दहावी नंतर काय? असा मोठा प्रश्न समोर असतानाच वडिलांचे मित्र सतीश चिपकर यांच्या सल्ल्याने अनिल जाधव यांची भेट, मार्गदर्शन आणि दादर येथील अस्मिता अप्लाइड आर्ट अकॅडमी येथील प्रवेश यामुळे त्याच्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी मिळाली.
दगडाला योग्य पैलू पाडल्यावर त्याची एक उत्कृष्ट कलाकृती मिळते, तसेच चिन्मयच्या बाबतीत घडले. कलेची उपजत जाण आणि आवड असल्यामुळे स्वतःच्या मेहनतीने त्याने एक एक पायरी प्रवास करून अनेक कामे आणि यश आपल्या नावे करून घेतली आहेत. सुरुवातीला मॅक डोनाल्डस् सारख्या नामांकित ब्रँडसाठीच्या फोटोशूटपासून सुरू झालेला प्रवास आजतागायत त्याच्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणामुळे दिमाखात सुरू आहे.
सत्यघटनेवर आधारित ‘स्टेअरकेस’ ही अवॉर्ड विनिंग शॉर्टफिल्म, ’मोकळी’, ’सोंगा’ या वेगवेगळ्या विषयांवर आधारित शॉर्टफिल्मसाठी उत्कृष्ट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर म्हणून गौरव. ’कोकण-कोकण’ या गाण्यातून कोकणातील सौंदर्य आणि परंपरा यांची कलेच्या माध्यमातून उत्तम सांगड घालून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. त्याच्या या व यासारख्या अनेक कामांची दखल घेता, २०२४ साली प्रथमच पंजाब किंग्स या आयपीएल संघाकडून चिन्मयची डीओपी म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर दबंग दिल्ली (प्रो-कबड्डी) या संघाकरिता त्याने कामगिरी बजावली आहे. यावर्षी आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट या संघाकरिता प्रमुख सिनेमॅटोग्राफर म्हणून त्याची निवड झाली आहे.














































2.jpg)





























.jpg)























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.