केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या उद्देशाने उड्डाणपुलाखालील नियोजन आणि प्लास्टिक बंदी या मुद्द्यांवर शासनाच्यावतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र चर्चा सुरू असतानाच ही बैठक लवकर उरकल्याने लांजातील व्यापार्यांमधून संताप व्यक्त करण्यात आला. लांजा-कुवे नगरपंचायत क्षेत्रातील भूसंपादित रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटवून जागा मोकळी करणे व लांजा शहर परिसर स्वच्छ करणे त्याचप्रमाणे प्लास्टिक बंदी या संदर्भात सोमवार, १३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता साटवली रोडवरील संकल्प सिद्धी सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी राजेंद्र कुलकर्णी, तहसीलदार प्रियांका ढोले, लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले, उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये तसेच हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.सदर बैठकीत प्लास्टिक बंदीबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. शहरातील उड्डाणपुलाखाली ठेवण्यात आलेले बंद खोके त्वरित हटविण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
तसेच उड्डाणपुलाखालील जागेचा वापर करताना लहान व्यवसायिकांची योग्य व्यवस्था करण्यात येणार असून, यासाठी हॉकर्स संघटनेला विश्वासात घेऊनच पुढील नियोजन केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, बैठक सुरू असतानाच ती लवकर उरकल्याने उपस्थित व्यापार्यांनी संताप व्यक्त केला. चर्चा करायची नव्हती तर आम्हाला बोलावले कशासाठी? असा सवाल करत व्यापार्यांनी संताप व्यक्त केला. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात आली.























































































































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.