loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न; मतदारयादी अचूक करण्यावर भर

खेड (प्रतिनिधी) : पक्षबांधणी व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सुरू असलेल्या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकींच्या अनुषंगाने गुरुवार, १६ एप्रिल रोजी रायगड लोकसभा मतदारसंघाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक खेड शहरातील वैश्य भवन येथे पार पडली. या बैठकीस गृहराज्यमंत्री योगेश कदम प्रमुख उपस्थित होते. बैठकीत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. विशेषतः मतदारयाद्या अचूक व अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रत्येक पात्र मतदाराचा नाव मतदारयादीत समाविष्ट व्हावा यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच चुकीच्या व डुप्लिकेट नोंदी हटवण्यासाठी संघटनात्मक पातळीवर सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच बूथ स्तरावर काम अधिक प्रभावी करण्यासाठी बीएलओंशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर सक्षम व प्रशिक्षित बीएलए नेमून मतदारयादी अद्ययावत ठेवण्यावर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. या आढावा बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

शिवसेनेचे काम, धोरणे आणि नेतृत्वाचा संदेश अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असेही यावेळी सांगण्यात आले. या बैठकीस शिवसेना उपनेते संजयराव कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, नगराध्यक्ष माधवी बुटाला, खेड पंचायत समिती सभापती आफिया पालेकर, उप सभापती सुनील मोरे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg