loader
Breaking News
Breaking News
Foto

मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात महिलेची सोन्याची चैन चोरी

ठाणे (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकात गर्दीच्या वेळी रेल्वे प्रवासात चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नाहूर येथील सत्यावती वनियर (५९) या महिलेचे ठाण्याकडे येताना लोकलमध्ये प्रवासादरम्यान सोन्याची चैन चोरीला गेली. त्या १३ एप्रिल रोजी दुपारी नाहूर स्टेशनवरून आसनगाव स्लो लोकलमध्ये चढल्या होत्या. ठाणे स्टेशनवर उतरताना त्यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची, सुमारे ४९,२२० रुपये किंमतीची सोन्याची चेन चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg