loader
Breaking News
Breaking News
Foto

सुख नदीवरील पूल तोडताना पोकलेन मशीन नदीत कोसळली ---

वैभववाडी (प्रतिनिधी)- येथील सुख नदीवरील पूल तोडताना पोकलेन मशीन 50 फूट खोल नदीत कोसळल्याची दुर्घटना आज वाभवे शहराजवळील एडगाव या गावी घडली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. वैभववाडी तालुक्यातील तळेरे करूळ हायवेचे रुंदीकरण सुरु असून त्यावरील सुख नदीवरील जुन्या पुलाचे तोडकाम सुरु आहे. आज दुपारी हे काम पोकलेन मशीनने सुरु असताना चालकाचा मशीनवरील ताबा सुटला आणि पोकेलन मशीन 50 फूट खोल नदीत कोसळली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यात मशीनचे मोठे नुकसान झाले. मात्र पोकलेन मशीनचा ऑपरेटर अर्जुन शाहा (22) रा.बिहार हा सुदैवाने बचावला. त्याला साधारण खरचटले असल्याचे सांगण्यात येते. पूल तोडून आता नवीन पूल बांधण्यात येणार आहे. तळेरे -करूळ रस्त्याच्या दुसर्‍या टप्यातील रुंदीकरणासाठी 160 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील कोकिसरे नदी, सुख नदीवरील पूल व करूळ जामदार नदीवरील पूल हे नवे बांधण्यात येणार असून त्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे असं सांगण्यात येते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts