loader
Breaking News
Breaking News
Foto

एसटी कर्मचार्‍यांची थट्टा! केवळ 56% पगार

मुंबई,- एसटी कर्मचार्‍यांची राज्य शासनाने जणूकाही थट्टा मांडली आहे. दरमहा वेतनापोटी देण्यात येणार्‍या निधीत शासनाने अचानक कपात केल्याने मार्च महिन्याचा केवळ 56% पगार अदा करण्यात आला आहे. महामंडळाच्या इतिहासात आजवर असे कधीच झाले नाही, असे कर्मचारी नेत्यांचे म्हणणे असून त्यांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. दरम्यान ‘लाडकी बहिण’ एसटी कर्मचार्‍यांवर कोपल्यामुळे केवळ 56 % पगार देण्याची वेळ सरकारवर आली की काय? असाही एक सवाल उपस्थित केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी सरकारकडून दर महिन्याला सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम देण्यात येते. साधारणपणे 460 कोटी रूपये राज्य शासनाच्या तिजोरीतून दरमहा दिले जातात. हे पैसे दरमहा 10 तारखेच्या आत देण्याची हमी न्यायालयात सरकारने दिली आहे. तरीदेखील ते वेळेवर जमा होत नाहीत. मार्च महिन्याच्या पगारासाठी जेमतेम 273 कोटी रूपयेच शासनाकडून देण्यात आल्याने पूर्ण पगार देण्यात महामंडळाला अपयश आले असून त्यामुळे 56% पगार अदा करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

मार्च महिन्याच्या वेतनासाठी व इतर थकीत देणी दर यासाठी शासनाकडे 925 कोटी रुपये इतका निधी मागण्यात आला होता. पण प्रत्यक्षात 272 कोटी 96 लाख रुपये एवढाच निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातील 40 कोटी रुपये कर्मचार्‍यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड रक्कम एसटी बँकेकडे भरावी लागली. राज्यातील 87 हजार एसटी कर्मचार्‍यांना पूर्ण वेतन देण्यासाठी 460 कोटी रुपये इतकी रक्कम लागते. मात्र अपुरा निधी प्राप्त झाल्याने 56 टक्के इतकेच वेतन एसटी कर्मचार्‍यांच्या खात्यावर जमा झाले असल्याने कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सुरक्षारक्षकांना 50% वेतन अ‍ॅप्रेंटस वेतन, निवृत्त अधिकारी वेतन 100 टक्के अदा करण्यात आले आहे. मात्र नियमित कर्मचार्‍यांचे 56 टक्के तर सुरक्षा रक्षकाचे 50 टक्के वेतन देण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेनेसुध्दा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg