loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुकमध्ये नवागतांचे उत्साहात स्वागत

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : लांजा तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्रीराम विद्यालय व तुकाराम पुंडलिक शेटये कनिष्ठ महाविद्यालय व का.रा.कोळवणकर यामाहा ट्रेनिंग स्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिनांक 16 जून 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते दहावी वर्ग सुरू झाले. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात शाळेच्या प्रवेशद्वारापासून स्वागत करण्यात आले. मुलांवर फुलांचा वर्षाव करत त्यांचे औक्षण करण्यात आले व गुलाब पुष्प देऊन त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाचवी ते आठवीच्या सर्व मुलांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष अमोल रेडीज, त्यांच्या सौभाग्यवती सौ अस्मिता रेडीज, संस्थेचे सहसचिव सुरेश चव्हाण, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष पंढरी गुरव, शिक्षक पालक संघाचे सदस्य श्रीकृष्ण गुरव, सदस्य सौ संजीवनी मोसमकर, मुख्याध्यापक अरुण डोळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक बंडगर यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg