खेड - खेड तालुक्यातील मुळगाव (सवणस) येथे ग्रामदैवत श्री झोलाई देवीचा शिमगोत्सव यंदा मोठ्या उत्साहात आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. गावभर भगवे झेंडे, बॅनर, आकर्षक सजावट आणि लाइटिंग करण्यात आली होती. महादापुरी सेवाभावी संस्थेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गावातील लहान मुले आणि महिलांनी आपले कलागुण सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. पहाटे सर्व मानकरी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत होळी व होमाचे दहन करण्यात आले.
पारंपरिक गीतांच्या गजरात होळीभोवती पाच फेऱ्या मारून उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर संध्याकाळी देवीच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी पारंपरिक नववारी साडी आणि भगवे फेटे परिधान करून लेझीम नृत्य सादर केले. यावर्षी प्रथमच महिलांनी पालखी नाचवून देवीचा आशीर्वाद घेतला. देवीची पालखी गावातील प्रत्येक घरामध्ये नेण्यात आली. कार्यक्रमादरम्यान चांगली पालखी नाचविल्याबद्दल दीपक माणके आणि किशोरी घोलप यांना बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा राजेंद्र घोलप आणि पल्लवी नागेश शिरगावकर यांनी केले. या कार्यक्रमाला पोलीस उपविभागीय अधिकारी सनस यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संपूर्ण कार्यक्रमात महिला मंडळ आणि ग्रामस्थांचे योगदान उल्लेखनीय होते. दरम्यान, ८ मार्च रोजी संध्याकाळी देवीची पालखी पुन्हा मंदिरात येऊन धूलवट साजरी होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.