loader
Breaking News
Breaking News
Foto

केळ्ये ग्रामपंचायत येथे 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा

​रत्नागिरी (प्रतिनिधी): येथील ग्रामपंचायत आणि समता ग्रामसंघ, केळ्ये यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. ​या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौरभी पाचकुडे यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्याच अध्यक्षतेखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. महिलांनी समाजात प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करावी आणि आपल्या हक्कांप्रति जागरूक राहावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी व्यासपीठावर उपसरपंच काशिनाथ बापट, ग्रामपंचायत सदस्य गजानन नाखरेकर, सदस्या राधिका कळंबटे, ग्रामपंचायत अधिकारी एस. आर. गोंडाळ आणि आरोग्य सेविका ज्योती सादगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून देत शुभेच्छा दिल्या. ​कार्यक्रमाच्या नियोजनात समता ग्रामसंघाचे मोलाचे योगदान राहिले. ग्रामसंघाच्या अध्यक्षा कौसर पावसकर आणि सचिव विणा लिंगायत यांच्यासह विविध बचत गटांच्या अध्यक्षा व सदस्यांनी या कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेतला.

टाईम्स स्पेशल

या वेळी या भागातील सामाजिक कार्यकर्त्या निकत डिंगणकर हीचा सत्कार करण्यात आला. हीने आपल्या दोन्ही मुलांना योग्य शिक्षण देऊन आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. महिला सक्षमीकरण आणि आरोग्याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. ​कार्यक्रमाचा समारोप उपस्थितांचे आभार मानून करण्यात आला. या उपक्रमामुळे केळय परिसरातील महिलांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg