loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुख येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा-१” अंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ओमेगा गार्डन हॉल, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, देवरुख येथे पार पडणार आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यात डिजिटल ७/१२ आणि ८अ उतारे, विविध दाखले व प्रमाणपत्रे, प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क तसेच अकृषक (NA) रूपांतरणासंदर्भातील मार्गदर्शन अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या शिबिरात तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी हे सर्व अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी आणि प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. महसूल प्रशासनाने तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg