loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा येथील जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

देवळे (प्रकाश चाळके) - लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत लांजा येथे आयोजित करण्यात आलेला जनता दरबार उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या जनता दरबाराला जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या समस्या, तक्रारी आणि मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. जनता दरबारात महसूल, ग्रामविकास, पाणीपुरवठा, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण, कृषी तसेच इतर शासकीय विभागांशी संबंधित प्रश्नांवर नागरिकांनी अर्ज दाखल केले. यावेळी सुमारे ५२ अर्जदारांनी आपली कैफियत मांडत विविध विषयांवर निवेदने सादर केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी आमदार किरण सामंत यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना देताना सांगितले की, “जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे. सामान्य माणसांच्या समस्या वेळेत मार्गी लागल्या पाहिजेत. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.” जनता दरबारादरम्यान अनेक प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. काही प्रकरणांमध्ये संबंधित विभागांना जागेवरच कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी राजापूर प्रांताधिकारी तसेच संबंधित विभाग प्रमुखांना जनता दरबारात प्राप्त झालेल्या प्रत्येक अर्जाचा सखोल पाठपुरावा करून त्याचा मार्ग काढावा आणि त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश दिले.

टाईम्स स्पेशल

यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याचे आवाहन करत प्रशासनाने लोकाभिमुख भूमिका घेतली पाहिजे, असे सांगितले. जनता दरबारामुळे नागरिकांना थेट प्रशासनापर्यंत आपले प्रश्न पोहोचविण्याची संधी मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लांजा तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी हा जनता दरबार महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी सर्व अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg