वैभववाडी (प्रतिनिधी) - करुळ जामदारवाडी धरणात तीन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या तीनही शाळकरी मुली असून दोघी करूळ भोयडेवाडी येथील तर एक कुसूर येथील आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. करूळ जामदारवाडी येथील धरणात अंघोळीसाठी गेलेल्या तन्वी अनंत माळकर (16 ) करूळ, स्वरा संदीप सुर्वे (11) कुसूर, ऋतिका संतोष पाटील (14 ) करूळ यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असणाऱ्या तिघांचे प्राण वाचले आहेत.
चार तरुणी आणि दोन तरुण असे एकूण सहा जण करूळ जामदारवाडी येथील धरणात अंघोळीसाठी गेल्यास पोहण्याचा मोह आवरता आला नाही त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने तिघीजणी पाण्यात बुडाल्या. बराच वेळ दिसून न आल्याने शोधाशोध केली असता पाण्यात बुडाल्याचे सहकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरोड केली गावातील काहींनी धरणाच्या दिशेने धाव घेतली. ताबडतोब तिघींना बाहेर काढले. परंतु प्राण वाचवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. एकूणच या दुर्दैवी घटनेने करूळ गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत पोलीस तपास करीत आहेत.











































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.