खेड (प्रतिनिधी) :- येथील खेड नगरपरिषद हद्दीत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रस्ता दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामांवरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. खेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजिमभाई सुर्वे यांनी संबंधित कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, शहरातील काही भागांत रात्रीच्या वेळी रस्त्यांचे डांबरीकरण सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन काम थांबवले. यावेळी कामाचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. रस्त्यांची कामे ही नागरिकांच्या उपस्थितीत आणि पारदर्शक पद्धतीने दिवसा करण्यात यावीत, तसेच संबंधित ठेकेदारांकडून कामाच्या गुणवत्तेची लेखी हमी घ्यावी, अशी मागणी काँग्रेसने खेड नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, या आरोपांमुळे नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.












































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.