loader
Breaking News
Breaking News
Foto

मोदींच्या आवाहनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची साद

ठाणे (प्रतिनिधी) : कोविड काळात देशातील जनतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यामुळे भारत सुरक्षितपणे कोविड संकटातून बाहेर पडला. आता देशासमोर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीतही नागरिकांनी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. आपल्या निवासस्थानाहून सह्याद्री अतिथीगृहात जाण्यासाठी त्यांनी ईव्ही गाडीचा वापर केला. त्यासोबतच आपल्या ताफ्यातील वाहने देखील कमी केली असल्याचे त्यांनी सांगितले. यात आपल्याला सुरक्षा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांची वाहने सोडल्यास अन्य वाहने सोबत ठेवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी विरोधकांवर टीका करताना शिंदे म्हणाले की, अशा गंभीर परिस्थितीत राजकारण करणे योग्य नाही. “राजकारण करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या संधी असतात, मात्र राष्ट्रहिताच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनीही आपला कौटुंबिक युरोप दौरा रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे नगरविकास दोन विभागातर्फे डेन्मार्क मध्ये आयोजित केलेला परदेश दौराही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या मंत्र्यांनीही प्रतिसाद दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg