loader
Breaking News
Breaking News
Foto

सी. बी. एस. ई. बोर्डाच्या परीक्षेत रोटरी स्कूल विज्ञान शाखेच्या 12वीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

खेड (प्रतिनिधी) - शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील सी. बी. एस. ई. इयत्ता 12 वी बोर्डाच्या विज्ञान शाखेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह आपल्या शाळेच्या निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या इ.12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये समृद्धी लवेकर ( 96.40) गुण मिळवत प्रशालेत प्रथम, सिद्धी शेळके ( 96.20 ) व केमिस्ट्री या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवत द्वितीय, पार्थ चव्हाण 95.20 गुण मिळवत प्रशालेत तृतीय येण्याचा बहुमान मिळविला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याचबरोबर इ.12 वी विज्ञान शाखेतील 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तनिशा चव्हाण ( 94.20 ), सानिका आग्रे ( 94.20 ), आयुष वाजे ( 94 ), इकसनूर कौर ( 94 ), ध्यानी पटेल ( 93.40 ), इरा कदम ( 93.20 ), धनश्री लंबाडे ( 93.20 ), श्रेया गुरसळे ( 93 ), अथर्व क्षीरसागर ( 92.60 ), गार्गी मयेकर ( 92.40 ), प्रक्षालिनी नाईकवडे ( 92.40 ), अनुष्का जैन ( 92.40 ), सृष्टी टेटांबे ( 92.20 ), तनुष सुर्वे ( 92 ), अर्जुन जाधव ( 91.40 ), सलाह झिंगू ( 91.20 ), रेहान मुल्ला ( 90.80 ), मानस पालकर ( 90.80 ), ईशा पवार ( 90.80 ), मनस्वी ताठरे ( 90.80 ), किंजल मोकारिया ( 90.40 ), ओम तोडकरी ( 90.40 ), इमाद खोत ( 90.20 ), तनिष्का सुर्वे ( 90 ), वरद जाधव ( 89.60 ), हर्ष टेमकर ( 89.60 ) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टाईम्स स्पेशल

तसेच 57 विद्यार्थ्यांनी 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण, 97 विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले. वरील सर्व विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg