खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील बोरज-आग्रेवाडी येथे ४५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुध आणण्यासाठी घराबाहेर पडलेला हा तरुण स्वतःच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद रामचंद्र चिनकटे (वय ४५, रा. बोरज-आग्रेवाडी, सध्या रा. शनिनगर-पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमवार, ११ मे रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान अरविंद हे आपल्या चारचाकी गाडीने (MH-12-VT-0286) "दूध आणायला जातो" असे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, दुपारी ३ वाजेपर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.
शोध घेत असताना बोरज येथील देऊळमाळ परिसरात त्यांची कार उभी असल्याचे ग्रामस्थांकडून समजले. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता अरविंद हे चालक सीटवर डॅशबोर्डवर डोके ठेवून बेशुद्ध अवस्थेत दिसून आले. त्यांना तातडीने गाडीबाहेर काढून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती. घटनेची माहिती पोलीस पाटलांमार्फत खेड पोलीस ठाणे येथे देण्यात आली. त्यानंतर अरविंद यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर रात्री ७:२० वाजण्याच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी खेड पोलीस ठाणे येथे बी.एन.एस.एस. कलम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण अ स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.












































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.