loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूल खेडच्या सी. बी. एस. ई. बोर्ड इ. बारावी वाणिज्य शाखेच्या 100 टक्के गुणवत्तेची परंपरा कायम

खेड (प्रतिनिधी) - शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील सी. बी. एस. ई. इयत्ता 12 वी बोर्डाच्या वाणिज्य शाखेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह आपल्या शाळेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये चिराग ओडोल याने ( 97.40) व अकाऊंट्स या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवत प्रशालेत प्रथम, मानसी कापसे हिने ( 97.20) गुण मिळवत प्रशालेत द्वितीय व हीत जोेयसर याने ( 94.60) गुण मिळवत प्रशालेत तृतीय येण्याचा बहुमान मिळविला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याचबरोबर इ.12वी वाणिज्य शाखेतील 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अन्वी कानडे ( 94.40), उल्ताफ मुकादम ( 94), श्रावणी आवटी ( 93.40), गौरी शेठ ( 93.40), श्वेता लांजेकर ( 92.60), अमिरा चौगुले ( 92.40), तन्वी कानडे ( 91.80), प्रार्थना उमराणीकर ( 91.40), ओम करवा ( 90.80), अंजली संदेशा ( 90.60), पूर्वा सुतार ( 90.20), स्वराज मुरूडकर ( 90) यांचा समावेश आहे. तसेच 23 विद्यार्थ्यांनी 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण, 27 विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले. वरील सर्व विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg