loader
Breaking News
Breaking News
Foto

पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून कुंभार्ली ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन

खेड [प्रतिनिधी] - मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ-कुंभार्ली गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विहिरीचे काम रखडल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मंडणगड पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन छेडले. भाजप नेते अँड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जलजीवन मिशनअंतर्गत गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे काम गेली दोन वर्षे अपूर्ण अवस्थेत आहे. यापूर्वी २०२५ मध्येही याच प्रश्नावर ग्रामस्थांनी ॲड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. त्या आंदोलनानंतर प्रशासनाने संबंधित विहिरीचे काम पूर्ण केले होते. मात्र, त्या विहिरीला खराब पाणी लागल्याने ग्रामस्थांना त्याचा कोणताही उपयोग झाला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर नागरिकांनी नवीन विहिरीची मागणी केली होती. दुसऱ्या विहिरीला मंजुरी मिळूनही संबंधित अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे आणि कामकाजातील हलगर्जीपणामुळे कामाला गती मिळाली नाही. परिणामी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत गेला. या पार्श्वभूमीवर १३ मे रोजी पुन्हा एकदा ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनादरम्यान भाजप नेते ॲड. वैभव खेडेकर यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. "ग्रामस्थांना मूलभूत सुविधांसाठी वारंवार आंदोलन करावे लागत असेल, तर ही प्रशासनाची मोठी अपयश आहे," असा आरोप त्यांनी केला.

टाइम्स स्पेशल

यावेळी अधिकाऱ्यांनी संबंधित विहिरीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही, तर अधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्चीत बसू देणार नाही, असा इशाराही ॲड. वैभव खेडेकर यांनी प्रशासनाला दिला. या आंदोलनात कुंभार्ली गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg