loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाच्या एकमेव उमेदवार प्रणाली तेली विजयी

लांजा (संतोष कांबळे) :-लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाच्या एकमेव उमेदवार प्रणाली गुरुप्रसाद तेली भरघोस मतांनी निवडून आल्या असून त्या लांजा नगरपंचायतीमध्ये भाजपाच्या एकमेव नगरसेविका असणार आहेत. शिवसेना (शिंदे), भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या महायुतीच्या ताब्यात लांजा नगरपंचायतीची सत्ता गेली असून १७ नगरसेवकांमध्ये फक्त एक नगरसेविका भाजपा पक्षाची निवडून आली आहे. भाजपा पक्षाचे खमके नेते गुरुप्रसाद तेली यांच्या पत्नी प्रणाली गुरुप्रसाद तेली या वार्ड नं. १० मधून निवडून आल्या आहेत. त्यांना २६९ मते मिळाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वार्ड नं. १० मध्ये जबरदस्त लढत झाली. या एकाच वार्डात तिन्ही उमेदवार एकाच जातीचे होते. गाव/शहर विकास आघाडीकडून मधुरा मिलिंद लांजेकर व शिवसेना उबाठा पक्षातर्फे स्वरा मनोज राऊत या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. चुरशीची लढत मात्र प्रणाली गुरुप्रसाद तेली व मधुरा मिलिंद लांजेकर यांच्यात झाली. भाजपाच्या चिन्हावर लढलेल्या प्रणाली गुरुप्रसाद तेली यांना २६९ मते मिळाली. तर मधुरा मिलिंद लांजेकर यांना २३५ मते मिळाली. स्वरा राऊत यांना मात्र ८९ मतांवर समाधान मानावे लागले.

टाईम्स स्पेशल

भाजपा उमेदवार प्रणाली तेली यांच्या प्रचाराची सारी धुरा भाजपच्या शहर अध्यक्ष मयूर शेडे, गुरुप्रसाद तेली यांच्यासह भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यानी संभाळली. आमदार किरण सामंत यांचे नेतृत्व व वार्डातील कार्यकर्ते यांच्यामुळे मी विजयी झाली आहे. अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगरसेविका प्रणाली गुरुप्रसाद तेली व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg