loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगरपरिषद नवनिर्वाचित नगरसेवकांचा राजवैभव पतसंस्थेकडून सत्कार

खेड (प्रतिनिधी) – राजवैभव नागरी सहकारी पतसंस्था मर्या. खेड यांच्या संचालक मंडळाच्या वतीने खेड नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक रहीम युसुफ सहिबोले तसेच नगरसेविका वैभवी (हेमा वहिनी) वैभव खेडेकर आणि स्वप्नाली राकेश चव्हाण यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर, संचालक मंडळाचे सदस्य आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल नवनिर्वाचित प्रतिनिधींना शुभेच्छा देत, त्यांच्या सामाजिक आणि विकासात्मक कार्यातून खेड शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. सत्काराला उत्तर देताना रहीम युसुफ सहिबोले यांनी जनतेने दिलेल्या विश्वासास पात्र ठरण्याचे व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आश्वासन दिले.

टाइम्स स्पेशल

यावेळी नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर आणि स्वप्नाली राकेश चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त करत, महिला सक्षमीकरणासह नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व मूलभूत विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. राजवैभव पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर यांनी पतसंस्थेच्या वतीने शुभेच्छा देत, शहराच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका कायम राहील, असे नमूद केले. संचालक मंडळाच्या सदस्यांनी नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविकांच्या कार्यकाळात खेड शहराला नवी उंची मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडले असून उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg