loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

कोर्लई (राजीव नेवासेकर) - मुंबई येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत ओकिनावा शोरीन रियु कराटे डो, उडेन टी कोबुजूत्सु असोसिएशन रायगडच्या कराटेपट्टूनी २ सुवर्ण, ४ रजत, ७ कांस्यपदके मिळवून चमकदार कामगिरी केली. ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर आणि महाराष्ट्र अम्यॅचुअर स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत दादर येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात राज्यभरातील अनेक कराटे संघटनांनी भाग घेतला होता. रायगड जिल्ह्यातील रसायनी व मजगाव - नांदगाव येथील शोरीन रियु कराटे डो च्या कराटेपट्टूंनी या स्पर्धेत एकूण १३ पदकाची कमाई केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यात पुढील खेळाडूंचा समावेश आहे. रसायनी येथील कराटेपट्टू शर्वरी अभिषेक तांबडकर, वैदेही समीर कुलकर्णी यांनी सुवर्ण पदक पटकाले असून शांभवी संदेश सावंत, आरंभ विश्वजीत गणतांडेल, त्रिशा नवीन गट्टू, ख़ूशी सर्वेश शेट्ये यांनी रजत पदक पटकावला असून ईश्वरी अभिषेक तांबडकर, स्वरूप उमेश जांभळे, अंश जालिंदर गहिरे तसेच काव्या केतन नाक्ती (खार मजगाव) आणि आर्यन स्वप्निल गद्रे (नांदगाव) जय गणेश ठाकूर(नांदगाव) अब्दुल रहेमान कामिल कापसे (नांदगाव)हे सर्व कांस्यपदकाचे मानकरी ठरले आहेत.

टाइम्स स्पेशल

सर्व कराटेपट्टूंना आंतरराष्ट्रीय पंच क्योशी- विजय चंद्रकांत तांबडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षक रेन्शी - अभिषेक गजानन तांबडकर व सेन्सई - आकांक्षा विजय तांबडकर, सेंम्पाय - स्वप्ना अभिषेक तांबडकर यांचे मार्गदर्शन लाभले. रायगडच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत मिळविलेल्या यशाबद्दल जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg