loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा युवा नेते अनिकेत पटवर्धन आणि नगरसेविका वर्षा ढेकणे यांचे अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष बिजली खान यांचेकडून अभिनंदन

रत्नागिरी - रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार वर्षा पर्शुराम ढेकणे निवडणू आल्याबद्दल मच्छिमार नेते व सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी त्यांचे अभिनंदन केले. रत्नागिरीतील युवा नेतृत्व आणि भाजपाच्या विजयाचे शिल्पकार, राजकारणातील एक तरुण अनुभवी व्यक्तीमत्व किंगमेकर म्हणता येईल असे अनिकेत पटवर्धन यांचेदेखील महायुतीच्या भव्य यशाबद्दल त्यांनी अभिनंदन केले. रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडणुन आणण्यात अनिकेत पटवर्धन यांचा सिंहाचा वाटा असल्याचे म्हटले जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक १५ मधुन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वर्षा परशुराम ढेकणे यांचा तब्बल १,३६५ मतांनी विजय झाला. वर्षा ढेकणे या लोकांसाठी सामाजिक काम करणार्‍या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांचा लोकसमूह दांडगा असून मतदारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी घरापर्यंत जात असतात. अल्पसंख्याक नेते अब्दुल बिजली खान यांनी या निवडणुकीत महायुतीचे काम निष्ठेने पार पाडले. त्यामुळे बिजली खान यांनाही धन्यवाद देण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg