loader
Breaking News
Breaking News
Foto

इंटरनॅशनल जनरल नाॅलेज ऑलिंपियाड परीक्षेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पटकावली 29 सुवर्ण पदके

(खेड - प्रतिनिधी) - ऑक्टोबरमध्ये विज्ञान ऑलिंपियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल जनरल नाॅलेज ऑलिंपियाड (आय.जी.के.ओ) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी इयत्तानिहाय्य 29 सुवर्ण पदके पटकावून यश प्राप्त केले. शालेय विद्यार्थ्यांना चालू घडामोडी व सामान्यज्ञान यावर आधारित दरवर्षी इंटरनॅशनल जनरल नाॅलेज ऑलिंपियाड (आय.जी.के.ओ) परीक्षा ही आयोजित केली जाते. या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून विद्यार्थी प्रविष्ट होतात. रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रविष्ट होऊन जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभ्यासाची उत्तम तयारी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुवर्णपदक प्राप्त यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रेयांश बुटाला (इयत्ता - पहिली), अन्वय भोई (इयत्ता - पहिली), ओवी सुर्वे (इयत्ता - पहिली), रेयांश राऊत (इयत्ता - दुसरी), सारांश राऊत (इयत्ता - दुसरी), संस्कृती कदम (इयत्ता - दुसरी), सौम्या माणके (इयत्ता - तिसरी), स्वराज सावर्डेकर (इयत्ता - तिसरी), इबाद परकार (इयत्ता - तिसरी), स्तवन जाधव (इयत्ता - चौथी), आहाना बुटाला (इयत्ता - पाचवी), मृण्मयी घाडगे (इयत्ता - पाचवी), शौर्य बनाफर (इयत्ता - पाचवी), श्रीहर्ष आग्रे (इयत्ता - सहावी), अधिराज गाडबैल (इयत्ता - सहावी), वेद यादव (इयत्ता - सहावी), पार्थ धवळे (इयत्ता - सातवी), हेरंब लोंढे (इयत्ता - सातवी), वीर कालेकर (इयत्ता - सातवी), विभा पाडलेकर (इयत्ता - आठवी), आराध्य मेहता (इयत्ता - आठवी), अर्णव परकाळे (इयत्ता - आठवी), मयंक हटकर (इयत्ता - नववी), वेदा मेहता (इयत्ता - नववी), ईश्वर चव्हाण (इयत्ता - नववी), वरद चव्हाण (इयत्ता - दहावी), हादी मुकादम (इयत्ता - दहावी), कृष्णा कदम (इयत्ता - दहावी), हिमांशू पवार (इयत्ता - दहावी) यांचा समावेश आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे त्यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केेले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg