loader
Breaking News
Breaking News
Foto

फाईल अडकली; आंदोलनाचा इशारा, न्यू मांडवे धरणासाठी भूमिपुत्र झाले संतप्त

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील न्यू मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला किंजळे तर्फे नातू, घोगरे, दहिवली, शिंगरी, पुरे, मांडवे आणि तळे या गावांतील मोठ्या संख्येने भूमिपुत्र उपस्थित होते. सभेची सुरुवात रवींद्र निकम यांनी केली. नितीन जाधव यांनी आतापर्यंत धरणासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २६ जानेवारी २०२२ रोजी लाक्षणिक उपोषण केल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली आणि प्रकल्पाची फाईल वेगाने पुढे गेली. मात्र मागील तीन वर्षांपासून ही फाईल वित्त विभागात अडकून पडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विलंबामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत नितीन जाधव यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी उपस्थितांना एक महिन्याचा वेळ देत सांगितले की, या काळात सर्वांनी एकत्र येऊन शासनाकडे पाठपुरावा करावा. सभेत उपस्थित भूमिपुत्रांनी धरण पूर्ण होणे, योग्य पुनर्वसन व वाढीव मोबदला या मागण्या ठामपणे मांडल्या. आपण आतापर्यंत संघटित न झाल्याची चूक मान्य करत, आता एकत्रितपणे लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रत्येक गावातील प्रतिनिधींमधून न्यू मांडवे धरण कोअर कमिटी स्थापन करण्यात आली. यावेळी नितीन जाधव कि तुमच्या हातात एक महिना आहे. या कालावधीत जे काही करता येईल, ते करा. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम असून तो निर्णय मागे घेणार नाही, अशी भूमिका जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी स्पष्ट केली. न्यू मांडवे धरणप्रश्नी २६ जानेवारी रोजी आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम असल्याची भूमिका ग्रामस्थांसमवेत झालेल्या सभेत मांडली.

टाईम्स स्पेशल

जाधव यांना आत्मदहनापासून परावृत्त करण्यासाठी लवकरच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेवून पुढील निर्णय घेण्याचा मंत्रालयात अडकलेली फाईल पुढे नेण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याचे कोअर कमिटीने निश्चित केले. न्यू मांडवे धरण प्रकल्प गेल्या ४१ वर्षापासून रखडला आहे. या प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी जल फाऊंडेशन अध्यक्ष नितीन जाधव यांच्यासह ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. धरण प्रकल्पाची आवश्यक कागदपत्रांची फाईल अजूनही लाल फितीतच अडकून पडली आहे. प्रकल्पाच्या फाईलचे घोंगडे नेमके कुठे अडले आहे आणि विलंबाचे नेमके कारण काय हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची प्रकल्पस्थळी महत्वपूर्ण सभा पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg