loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी

संगलट (खेड)( इक्बाल जमादार) - २५ डिसेंबरची ख्रिसमसची सुटी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये कोकणात पर्यटनाकरिता पुणे व पश्चिम महाराष्ट्रातून ताम्हीणी घाट मार्गे आणि मुंबई कडून येणाणाऱ्या वाहनांचे प्रमाण वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. त्यातच माणगांव रेल्वे स्टेशन समोर एक ट्रक बंद पडल्याने सुमारे एक तास वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गावर कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी वाढल्यामुळे इंदापूर ते माणगांव टप्प्यात वाहतूक संथ गतीने सुरू होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गोवामहामार्गाच्या इंदापूर-माणगांव बायपासचे काम रखडले असल्याने या टप्प्यात सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. माणगाव शहराच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळाले. दरम्यान वडखळ ते कोलाड या पट्ट्यातही मुंबईकडून येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक संथगतीने सुरु होती. मुंबई-गोवा महामार्गावरील पुलांची आणि नव्या पूलांच्या सव्र्व्हस रोडची कामे पूर्ण असल्याने ही वाहतूक कोंडी टप्प्याने होत असते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg